माझा महाराष्ट्र :
लाल दिव्याच्या गाडीसाठी नाही, तर आई-वडिलांच्या हातातील कोयता सोडविण्यासाठी मी अधिकारी झालो, असे भावनिक प्रतिपादन केले आहे, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संतोष खाडे याचे. संतोष याची मुलाखत राज्यभरात व्हायरल होत आहे.
मामांनी भाचीच्या लग्नात खर्च केले तीन कोटी : व्हीडीओ झाला व्हायरल
ही कथा आहे, बीड जिल्ह्यातील सावरगावपाट येथील संतोष खाडेची. ऊसतोड करणाऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या संतोषने मिळवलेल्या यशाची. संतोषने एमपीएससीच्या निकालात एनटी प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवला आहे. संतोषचे आई-वडील गेल्या ३० वर्षांपासून ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात. त्यामुळे संतोषचे पालपन एकतर ऊसाच्या फडात किंवा आजीसोबत घरी गेलं.
संतोष खाडेची गावकऱ्यांनी मिरवणूक काढली
सन २०२१ साली घेण्यात आलेल्या एमसीएससीच्या परीक्षेत एनटीडी प्रवर्गातून प्रथम येण्याचा मान संतोष खाडेने मिळवला आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निकालानंतर संतोषने फेसबुक पोस्ट लिहित त्याने मिळवलेलं यश हे आई-वडिलांच्या कष्टाचं चीज असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या शिवाय मी शून्य आहे. आई आणि बापूचं उभं आयुष्य माझ्यासाठी कष्ट करण्यात गेलं. तेव्हा मी कुठं इथपर्यंत पोहोचलोय. एका ऊसतोड कामगाराच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेलं माझं सावरगावघाट हे गाव आहे, या गावाला मी कधीच विसरू शकणार नसल्याचे संतोषने म्हटले आहे.
विमा नाकारला, न्यायालयाचा कंपनीला दणका : सव्वा कोटी देण्याचे आदेश
पाटोदा हा तालुका कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या गावातील बरेच लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी ऊसतोड करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात येतात. त्यातील खाडे कुटुंब. याच कुटुंबातील संतोष याने एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. गावातील लोकांनी संतोषचे कौतूक करत त्याची भव्य मिरवणूक काढत सन्मान केला.
या आमदाराने वाटल्या सात हजार सायकली आणि बरंच काही : शरद पवारांनी केले कौतूक
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तीत म्हटले, की ''बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील आमची भगिनी सोनाली मात्रे ही एमपीएससीत महिलांमधून राज्यात पहिली आली, तर संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगावघाट येथील ऊसतोड कामगाराचा मुलगा संतोष अजिनाथ खाडे हा महाराष्ट्रातून सोळावा आला. प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केल्याचे दोघेही उत्कृष्ट उदाहरण आहेत. दोघांचेही मनापासून अभिनंदन. अधिकारी बनून राज्याची सेवा करताना आपणआपल्या मातीशी व मातीतील माणसांशी प्रामाणिक राहून सेवा कराल, ही अपेक्षा.''



If you have any doubt, then contact me