". मामांनी भाचीच्या लग्नात खर्च केले तीन कोटी : व्हीडीओ झाला व्हायरल

मामांनी भाचीच्या लग्नात खर्च केले तीन कोटी : व्हीडीओ झाला व्हायरल

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

भाचा-भाची आणि मामा यांचं नात्याला एक वेगळंच प्रेमाचं वलय असतं. भाच्यांच्या प्रत्येक गोष्टीचं मामाला आप्रुप असतं. आणि त्यात भाचीचं लग्न म्हटलं, तर काय विचारता. तीन मामांनी आपल्या भाचीच्या लग्नात तब्बल तीन कोटी २१ लाखांच्या भेटी दिल्या आहेत. त्यात ८१ लाखांच्या रोख रकमेसह इतर अनेक भेटींचा समावेश आहे.

विमा नाकारला, न्यायालयाचा कंपनीला दणका : सव्वा कोटी देण्याचे आदेश

ही घटना आहे, राजस्थानमधील जयपूर येथील. नागौर जिल्ह्यात झालेल्या या लग्नात तीन मामा आपल्या भाचीच्या लग्नात चक्क बॅग भरून कॅश घेऊन पोहोचले. या बॅगेतील पैसे नवरीला भेट देण्यासाठी ताटात काढले, तेव्हा सर्व वऱ्हाडी डोळे मोठे करून या गोष्टीकडे पाहात होते. ज्या ठिकाणी हे लग्न झाले, त्याठिकाणी मायरा नावाची प्रथा आहे. या प्रथेनुसार वधू-वरांच्या मामांकडून अनेक भेटवस्तु दिल्या जातात. ही खूप जुनी प्रथा आहे. जायल भागातील झाडेली गावातील ही प्रथा आहे.

घेवरीदेवी आणि भंवरलाल पोतालिया यांची मुलगी अनुष्का हिचे नुकतेच लग्न झाले. अनुष्काला हरेंद्र, रामेश्वर आणि राजेंद्र हे तीन भाऊ आहेत. तिघेही अनुष्काच्या लग्नात करोडो रुपये घेऊन पोहोचले. भेटवस्तुंसोबतच अनुष्काला मामांनी तिच्या आईला ५०० रुपयांच्या नोटा लावलेली ओढणीही दिली.

एसटीने नवऱ्याला रजा दिली नाही : कर्मचाऱ्याच्या पत्नीचे डेपोत झोपून आंदोलन

या तीन मामांनी आपल्या भाचीला लग्नात तीन कोटी २१ लाख रुपयांच्या भेटी दिल्या आहेत. त्यात ८१ लाख रुपये रोख, १६ एकर शेती, ३० लाखांचा प्लॉट, तीन किलो चांदी, ४१ तोळे सोने, धान्याने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर, एक स्कुटी व गावातील प्रत्येक घरासाठी एक चांदीचं नाणं, यांचा समावेश आहे.

विमानतळावर गोंधळ घालने तरुणीला पडले महागात

झाडेली गावातील आतापर्यंत झालेल्या सर्व लग्नांचे रेकॉर्ड या लग्नाने मोडले असून या व्हीडीओची सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)