माझा महाराष्ट्र :
इव्हीएमबाबत (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन) राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (दि. २३ मार्च २०२३) विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात देशातील विरोधी पक्ष ईव्हीएमच्या विरोधात एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी ईव्हीएम मशीन बिघडली, की भाजपला मते जातात, असे वक्तव्य ज्येष्ठ विधीज्ञ कपील सिब्बल यांनी केले आहे. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परीषदेत सिब्बल बोलत होते.
या बैठकीसाठी पवार यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले होते. यावेळी अनेक विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. पवार यांनी पत्रात लिहिले आहे, की अनेक तज्ज्ञांच्या मते मशिनमध्ये चिप असेल, तर कोणतेही मशिन हॅक होऊ शकते. त्यामुळे ईव्हीएमही हॅक होऊ शकते. आम्ही कोणत्याही अनैतिक गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. यासंदर्भातील आपण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे आणि क्रिप्टोग्राफरचे मत ऐकून घेतले पाहिजे. आपण लोकशाहीला हॅक होऊ देऊ शकत नाही. जे लोक हे करीत आहेत, त्यांना आपण असं करून देऊ शकत नाही. निवडणुका निष्पक्ष आणि स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल.
कोण होते बैठकीला उपस्थित?
शरद पवार यांच्या दिल्लीस्थित घरी झालेल्या या बैठकीला प्रफुल्ल पटेल, समाजवादी पक्षाकडून रामगोपाल यादव आणि कपील सिब्बल, कॉँग्रेसकडून दिग्वीजय सिंह व त्यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. तृणमूल कॉँग्रेसकडून मात्र कोणी उपस्थित राहिले नाही.
काय म्हणाले कपील सिब्बल?
ईव्हीएमबाबत आम्ही अनेक वेळा निवडणूक आयोगाकडे गेलो. जेव्हा जेव्हा मशीन बिघडते, तेव्हा तेव्हा मत भाजपला कसे जाते? याबाबत आम्ही काही प्रश्न आयोगासमोर उपस्थित केले. त्याचं उत्तर अजूनही त्यांनी दिलेलं नाही. आमच्या प्रश्नांचं आम्हाला लेखी उत्तर अपेक्षीत आहे, ते त्यांनी द्यावं. उत्तर दिल्यास लोकंमधील संभ्रम दूर होईल. निवडणूक आयोगाने उत्तर न दिल्यास आम्ही सर्व विरोधी पक्ष मिळून काही तरी निर्णय घेऊ. बाकी देशात ईव्हीएमचा वापर होत नाही, मग आपल्याच देशात याचा वापर का होतो? चुकीच्या पद्धतीने कुणी जिंकत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही.
काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसनेही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यानंतर शरद पवारांनी याच विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले. त्यावरून येत्या काळात विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात एकत्र येतील, अशी चिन्हे आहेत. फेब्रुवारीत झालेल्या कॉँग्रेसच्या महाअधिवेशनातही याबाबत चर्चा झाली होती. यावेळी कॉँग्रेसनं म्हटलं होतं, की १४हन्ूा अधिक मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी तसेच अनेक प्रतिष्ठीत कार्यकर्ते आणि आयटी तज्ज्ञांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे.



If you have any doubt, then contact me