माझा महाराष्ट्र :
सरकारी अधिकार्यांच मुजोरीचा अनुभव सगळ्यांनाच कमी अधीक प्रमाणात येत असतो. यावेळी एका सरकारी अधिकाऱ्याने तर हद्दच केली आहे. ‘‘रस्त्याच्या कामात जो कुणी मध्ये येईल त्याला जेसीबीच्या खोऱ्याखाली घेऊन पुरून टाक’’, अशी धमकी त्याने गावकऱ्यांना दिली आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून या अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमधील धारूर पंचायत समितीच्या अंतर्गत जहागीर मोहा या गावात रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने रस्त्याचे काम लवकर व चांगले करावे, अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली होती. गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे या रस्त्याचे काम थांबले होते. त्यामुळे पंचायत समितीचा हा अधिकारी येथे आला होता. या गावकऱ्यांची समजूत काढण्याच्या ऐवजी त्याने गावकऱ्यांना धमकीच दिली. हा अधिकारी धारून पंचायत समितीतील अभियंता आहे.
या धमकीचा व्हीडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या अधिकाऱ्याने यावेळी म्हटले, की जो कोणी कामाच्या मध्ये येईल, त्याला जेसीबीच्या खोऱ्याखाली घे. त्याला पुरून टाक. अशी धमकी देऊन एखाद्या गुंडालाही लाजवेल असे वर्तन या अधिकाऱ्याने केले आहे. यावेळी हा अभियंता चप्पल घेऊन लोकांवर धावला. या अधिकाऱ्याकडे पिस्तुल असल्याचीही तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंचायत समितीवर प्रशासक असल्यानेच या अधिकाऱ्यात ही हिंम्मत आल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
If you have any doubt, then contact me