माझा महाराष्ट्र :
सध्या राज्यभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकांनी कांदा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विरोधकांत माजी मंत्री आदित्य ठाकरेही (Aditya Thakre) सामील झाले होते. नेमके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत असतानाच आदित्य ठाकरे यांनी मध्येच टिप्पणी केली. त्यामुळे शिंदे यांनीही ‘ए बस खाली, तुला शेतीमधलं काय कळतंय’ असा टोला लगावला. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये हास्याची एकच खसखस पिकली.
त्याचे झाले असे, सध्या कांदाप्रश्नी राज्यभरातल्या शेतकरी संघटना व सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी मोठमोठी आंदोलनं होत आहेत. त्यात सभागृहातही घमासान सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने विरोधी आमदारही सरकारविरोधात एकवटले आहेत. विरोधी पक्षातील आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर सरकारला कांद्यासारखे सोलून काढू, असा इशारा विरोधकांनी दिला आहे. विधानसभेतही विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
विरोधी पक्षनेते अजित पवारही (Ajit Pawar) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने सर्व विषय बाजुला ठेवून शेतकऱ्यांचा विषय घ्यावा व त्यावरच चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. याप्रश्नी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, व केंद्र सरकारशी समन्वय साधून हे पश्न मार्गी लावा, अशी मागणी त्यांनी केली.
अजितदादांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. या गोंधळातच सरकारने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांच्या पाठिशी हे सरकार असून नाफेडकडून (Nafed) कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली. हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षाही जास्त मदत केल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे बोलत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाहून काहीतरी टिप्पणी केली व प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून ‘ए बस खाली, तुला शेतीमधलं काय कळतंय’ असं म्हणत टोला लगावला. त्यांच्या या वाक्याने शिवसेना आमदारांमध्ये चांगलीच खसखस पिकली.
Chief minister Eknath Shinde to Aditya Thakray
If you have any doubt, then contact me