माझा महाराष्ट्र :
महाराष्ट्रात एकही आमदार नसलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार नागालँडमध्ये निवडून आले आहेत. पक्षाने हा एक इतिहासच रचला आहे. आठवले यांनी ट्विटरवरून दोन्ही आमदारांचे अभिनंदन केले आहे.
नागालॅँडमध्ये नुकतीच निवडणूक झाली. यात रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे उमेदवारही उभे राहिले होते. आता भारतीय जनता पक्ष सत्तेच्या एकदम जवळ जाऊन पोहोचला आहे. आठवले गटाचे दोन आमदार निवडून आल्ययाने या सत्तेत रिपब्लिकन पक्षालाही सहभाग मिळणार आहे. तसे संकेत आठवले यांनी दिले आहेत.
रामदास आठवले यांनी थेट नागालँडमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा रोवला आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. यात रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अधिकृत उमेदवार इम्तिचोबा विजयी झाले आहेत. ते सुमारे 400 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. ते टूएनसंद सदर 2 विधानसभा मतदारसंघातून उभे होते. त्यांना एकूण 5 हजार 514 मते पडली. तसेच नोकसेन विधानसभा मतदारसंघातून वाय. लिमा ओनेन चँग विजयी झाले आहेत. त्यांनी 5 हजार 151 मते मिळवली आहेत.
‘ऊस शेतकरी’ या चिन्हावर रिपाइंने (आठवले गट) निवडणूक लढवली. नागालँडमध्ये पक्षाने एकूण आठ उमेदवार उभे केले होते. गुरुवारी निवडणुकीची मतमोजणी झाली. त्यातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयाबद्दल आठवले यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Two MLAs of RPI elected at Nagaland
If you have any doubt, then contact me