". ‘बच्चु कडू तुम्ही गद्दार आहात’ : आ. कडुंची गाडी अडवून वृद्धाचा आरोप

‘बच्चु कडू तुम्ही गद्दार आहात’ : आ. कडुंची गाडी अडवून वृद्धाचा आरोप

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आणि 10 अपक्ष आमदार जेव्हापासून भाजबरोबर (Bhartiya Janata party) सत्तेत गेले आहेत, तेव्हापासून सातत्याने त्यांना गद्दार (gaddar) या शब्दाचा सामना करावा लागत आहे. याचीच प्रचिती प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चु कडू (mla Bacchu Kadu) यांना पुन्हा आली. फक्त फरक इतकाच की यावेळी त्यांना काही करता आले नाही. 80 वर्षांच्या वृद्ध शेतकर्‍याने बच्चु कडू यांची गाडी अडवली व त्यांच्यावर ‘तुम्ही गद्दार आहात’ असा आरोप केला.


त्याचे झाले असे, आमदार बच्चु कडू न्यायालयीन कामकाजासाठी धारशीव (Dharashiv) येथे न्यायालयात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना कोर्ट संपेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली. शिक्षा संपल्यानंतर ते आपल्या गाडीतून कोर्टाच्या बाहेर जात असताना 80 वर्षे वयाचे शेतकरी अर्जुन भगवान घोगरे (Arjun Bhagwan Ghogare) यांनी बच्चु कडुंची गाडी अडवली. बच्चु कडू गाडीतून उतरल्यावर घोगरे यांनी त्यांना थेट बंडखोरीबाबत विचारले. आपण गुंडांसोबत गेलात आणि शेतकऱ्यांशी गद्दारी केली, अशी भावना व्यक्त घोगरे यांनी व्यक्त केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या शेतकऱ्याला बाजुला घेतले. त्यानंतर कडू यांना आपली गाडी काढता आली.


शिंदे गटातील आमदार आणि त्यांच्यासोबत गेलेले अपक्ष आमदार यांना बंडखोरी केल्यापासून सातत्याने अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कडू यांना असा विचित्र अनुभव आला. या घटनेचा व्हीडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.


घोगरे या व्हीडीओत म्हणताहेत, तुम्ही असे का वागत आहात, जरा नीट वागा ना, राज्यघटनेच्या चौकटीत वागा. जनतेला त्रास देऊ नका. असे घोगरे यांनी म्हटल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी घोगरे यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही गद्दारी नाही, तर गद्दारीचा बाप आहे. यांचं वागणं नीट आहे का? असा प्रश्न घोगरे यांनी यावेळी उपस्थित केला. बच्चु कडू डाकुंसोबत गेले. त्यांना ज्यामुळे निवडून दिले, ते तसे वागले नाहीत. जे सुरू आहे, ते योग्य नाही, घटनाबाह्य आहे, असे घोगरे म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)