माझा महाराष्ट्र :
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संभाजीराजे छत्रपतींची स्वराज्य संघटना पूर्ण तकदीने उतरणार आहे, अशी माहिती देऊन संभाजीराजे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू, समविचारी पक्षांना बरोबर घेऊ, असे संकेत त्यांनी दिले. स्वराज्य संघटना ही एक ब्रॅण्ड आहे. यापुढे युती करण्यासाठी आम्ही शिंदे-फडणवीस किंवा ठाकरे यांच्याकडे जाणार नाही. त्यांना गरज असेल, तर त्यांनी आमच्याकडे यावं , असं त्यांनी म्हटलं आहे.माजी खासदार संभाजी राजे छत्रपती धाराशीव (उस्मानाबाद) येथे स्वराज्य संघटनेच्या शाखांचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ५८ शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांच्या वक्तव्यानं राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, आम्ही आधी स्वतंत्र लढणार आहोत; मात्र समविचारी दोन लोक एकत्र आले, तर स्वातच आहे. जे पक्ष फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने चालतात, जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला सुसंस्कृत करू शकतात, त्यांच्यासाठी आम्ही ओपन आहोत.
महाविकास आघाडी सरकारने आधीच अस्थिर सरकार दिले. त्यानंतर नवीन आलेलं सरकारही अस्थिरच निघालं. लोक कंटाळलेले आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अशी टीका त्यांनी केली.
स्वराज्य संघटनेची स्थापना केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी आरोग्य, शेती आणि शिक्षण या प्रमुख मुद्द्यांना नागरीकांच्या भेटी-गाठी घेत आहेत. या दौऱ्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
थोडे स्वराज्य संघटनेबद्दल
स्वराज्य संघटना ही एक सामाजिक संघटना आहे. तिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दि. १२ मे २०२२ रोजी केली. ही संघटना शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले आहे. ही संघटना लवकरच राजकीय पक्ष म्हणून जाहीर होण्याची शक्यता आहे.
If you have any doubt, then contact me