माझा महाराष्ट्र : भारतीय वंशाचे अमेरिकन नागरीक नील मोहन (Neal Mohan) हे आता यूट्यूबचे (YouTube) नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive officer) असणार आहेत. युट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी ही माहिती दिली.
युट्यूब (YouTube) हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. नील मोहन युट्युबच्या वरिष्ठ उपाध्यक्षाची भूमिकाही पार पाडणार आहेत. ते सध्या YouTube चे मुख्य उत्पादन अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांनी युट्यूबसोबत काम सुरू केले. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून एमबीए केले असून एक्स्चेंज कंपनीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.
युट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट (Alphabet) चे सीईओ सुंदर पिचाई हे देखील भारतीय वंशाचे आहेत. गुगलदेखील या अल्फाबेट कंपनीच्या मालकीचे आहे. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी जवळपास 15 वर्षे एकत्र काम केले आहे. नील मोहन सुंदर पिचाई यांच्यासोबत काम करतील.

.jpeg)
If you have any doubt, then contact me