माझा महाराष्ट्र : मध्य प्रदेशातील कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर Sihor येथील कुबेरेश्वर धाममध्ये kubereshwar dham पाच लाख रुद्राक्षे वाटण्यात आली; मात्र तेथे दहा लाख भाविक उपस्थित होते. त्यामुळे रुद्राक्षासाठी चेंगराचेंगरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रदीप मिश्रा Pradeep Mishra यांनी कथा सांगताना, मृत्यू येणार असेल तर टळणार नाही. तो येणारच असे वक्तव्य केले. शिवाय येथे यायचे तर महादेवसाठी या, रुद्राक्षासाठी नको, असे आवाहन भक्तांना केले. दरम्यान, रुद्राक्ष न मिळालेले लोक पंडित मिश्रांविरोधात नारेबाजी करत माघारी जात होते.
कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममध्ये शिव महापुराण कथा व रुद्राक्ष वाटप महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवात चेंगराचेंगरी होऊन मालेगाव येथील एक महिला ठार झाली, तर बुलढाण्याच्या एका महिलेसह तिघीजणी बेपत्ता झाल्या .
महोत्सवात मोठ्या संख्येने भाविक आल्याने भोपाळ-इंदूर महामार्गावर 20 किलोमीटर लांब ट्राफीक जाम झाला होता. तरीही भाविकांची ये-जा सुरूच होती. रुद्राक्ष न मिळाल्याने लोक पंडित मिश्रांविरोधात घोषणा देत होते. या गर्दीमुळे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्सवस्थळी भेट रद्द केली.
रुद्राक्ष वितरणासाठी चाळीस काउंटर उभारण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक भाविकांना रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले आहे.
रुद्राक्षासाठी दोन किलोमीटरची रांग
गुरुवारी रुद्राक्षसाठी दोन किलोमीटर लांब रांग होती. दोन लाखांहून अधिक लोक रांगेत उभे असल्याचा अंदाज आहे. गर्दी रोखण्यासाठी बांबू आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता.

.jpeg)
If you have any doubt, then contact me