माझा महाराष्ट्र : व्हॅलेंटाईन डे Valentine's Day म्हणजे दि. १४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी बागेत बसलेल्या पती-पत्नीला प्रेमी युगूल समजून बजरंग दलाच्या Bajrang Dal कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे जोडपं पती पत्नी असल्याचे समोर आल्यानंतर मात्र या कार्यकर्त्यांनाच चांगलेच फटके पडले. त्यांची दादागिरी त्यांना चांगलीच महागात पडली. याची मोठी खमंग चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे.
दिल्लीपासून Delhi अवघ्या काही अंतरावर असलेल्या फरीदाबाद Faridabad परिसरात ही घटना घडली. बागेत बसलेल्या जोडप्याला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण होत असल्याचे पाहून तेथील स्थानिकांनी यात हस्तक्षेप केला. हे जोडपे पती-पत्नी असल्याची खात्री झाल्यावर नागरिकांनी या कार्यकर्त्यांना पकडून चांगलेच फटके दिले. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी हे बजरंग दलाचे कार्यकर्ते पळून गेले. यावेळी काहींनी या घटनेचे व्हीडीओही बनवले. ते आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यात नागरिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मागे काठ्या घेऊन पळताना दिसत आहेत.
If you have any doubt, then contact me