pub-1148580553039874
माझा महाराष्ट्र : राज्यपाल (governor) ' कसा नसावा ' याचं उदाहरण म्हणजे भगतसिंग कोश्यारी (Bhagatsing Koshyari) आहेत, अशी टीका सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे.
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना अंधारे बोलत होत्या.
अंधारे पुढे म्हाणल्या , 'अतिथी देवो भवं' असं म्हणत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे, अशी परंपरा या महाराष्ट्राची (Maharashtra) आहे ; मात्र राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी इतक्या काही पद्धतीने महाराष्ट्राची मनं दुखावली, की महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये राज्यपाल कसा नसावा, याचं उदाहरण म्हणून कुणाला नाव सांगतील लोक, तर ते राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचं. ईडी सरकारला महाराष्ट्राच्या अस्मितेची जरा जरी झाड असती, तर 'असा राज्यपाल केंद्राने परत बोलावून घ्यावा', याचं विनंती पत्र त्यांनी तात्काळ लिहिलं असतं, जेव्हा ते महापुरुषांबद्दल वारंवार, ठरवून, खोडसाळपणे गरळ ओकत होते. आत्ता राज्यपाल कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्याचा जो ईडी सरकारने केलेला मानभावीपणा आहे, ही सरळ सरळ निवडणुकांच्या तोंडावरची खेळी आहे. लोकांच्या ज्या आहत झालेल्या अस्मिता आहेत, त्यांना मलमपट्टी लावण्याचा अत्यंत थातूरमातूर प्रकार, हा राजीनामा मंजूर करून केला आहे, पण यामुळे कोश्यारींनी एकूण केलेल्या वक्तव्याने झालेली महाराष्ट्राच्या अस्मितेची हेळसांड भरून निघणार नाही. जर खरोखरच त्यांना आपण केलेल्या चुकीची जाणीव असती, तर किमान एकदा तरी राज्यपाल कोश्यारींनी आपल्या वक्त्यांबद्दल दिलगिरी व्यक्त केली असती किंवा माफी मागितली असती.

If you have any doubt, then contact me