". ३१०० फूट उंच लिंगाणा केवळ 11 मिनिटांत केला सर : तानाजी केंकरे या गिर्यारोहकाचा पराक्रम

३१०० फूट उंच लिंगाणा केवळ 11 मिनिटांत केला सर : तानाजी केंकरे या गिर्यारोहकाचा पराक्रम

माझा महाराष्ट्र
1
माझा महाराष्ट्र : रायगड raygadh जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेला लिंगाणा lingana किल्ला समुद्रापासून तीन हजार फूट उंच आहे. 3100 फूट उंचीचा लिंगाणा किल्ला हा अनेक गिर्यारोहकांसाठी आव्हान ठरतो. हा किल्ला सर करण्यासाठी साधारणत: गिर्यारोहकांना जवळपास 2 तासाहून जास्त वेळ लागतो. पण तानाजी केंकरे Tanaji Kenkre या गिर्यारोहकानं हा किल्ला अवघ्या 11 मिनिटांत सर करुन पराक्रम गाजवला आहे. चढायला कठीण असलेला हा किल्ला इतक्या कमी वेळात चढल्याने नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

लिंगाणा हा रायगड किल्ल्याचा उपदुर्ग आहे. लिंगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथला कठीण चढाईचा सुळका. यावर जायची वाट पूर्णतः घसरडी आहे. दोराच्या सहाय्यानेच इथे चढता येते. या सुळक्याला सर करायला जवळ जवळ ३-४ तास लागतात. काही ठिकाणी तर सरळ कातळ चढावा लागतो. वाट कठीण आहे. मध्ये फक्त एक पाण्याचे कुंड आहे, बाकी कुठेही पाणी नाही. पण सुळका चढून गेल्यावर वेगळाच आनंद मिळतो. या सुळक्याच्या पूर्वेला राजगड आणि तोरणा, तर पश्चिमेस दुर्गराज रायगड आहे.

सामान्यपणे ट्रेकिंग किंवा कोणताही किल्ला, दुर्ग, गड चढायचा म्हटलं की गिर्यारोहक trekker एक खास प्रकारचा ड्रेस घालतात. म्हणजे आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा त्यांच्याकडे असते. विशिष्ट प्रकारचे शूझ आणि दोरीची मदतही ते घेतात. पण हा तरुण अनवाणी पायाने दोरीशिवायच लिंगाणावर चढला आहे.

या गडावर जाण्यास प्रथम महाडला Mahad यावे लागते. तेथून पाने pane गावाला जाण्यास सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ४.०० वाजता बसगाड्या आहेत. पाने गावातून साधारण पाऊण तासाच्या चढणीनंतर लिंगाणा माचीवर पोहोचता येते. तिथे पाणी भरून पुन्हा पाऊण तास चढल्यावर घसरड्या वाटेवरून माणूस अर्ध्या तासात लिंगाणा सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेपाशी येतो. ही वाट फारच अवघड आहे. सुरक्षेची काळजी घेतल्याशिवाय वर जाता येत नाही.

या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा, त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असत. पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे. जर कोणी कैद्याने पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमवावाच लागे. गडावरचे दोर आणि शिडा काढून घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद.

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा