माझा महाराष्ट्र :
कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये ४९ पैशांचा चेक देणे व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. बाजार समितीने या व्यापाऱ्याचा परवानाच निलंबित केला आहे. सोलापूर (Solapur) बाजार समितीने ही कारवाई केली आहे.
शेतकरी राजेंद्र चव्हाण (Rajendra Chavan) यांनी १० पोते कांदा (Onion) सोलापूर बाजार समितीत (Solapur Market committee) आणला होता. हा संपूर्ण कांदा फक्त ५१२ रुपयांना विकला गेला. मात्र हमाली, तोलाई आदी रकमा त्यातून वजा झाल्यामुळे केवळ दोन रुपयांचा धनादेश शेतकऱ्याला देण्यात आला.
ही घटना घडल्यानंतर समाजमाध्यमांवर (social media) याची मोठी चर्चा झाली. बाजार समितीवरही चहुबाजुंनी टीका झाली. त्यामुळे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. संबंधित व्यापाऱ्याला याप्रकरणी नोटीस बजावण्यात येऊन खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु खुलासा समाधानकारक नसल्याने त्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला आहे.
या व्यापाऱ्याने २.४९ रुपयांचे चेक शेतकऱ्याला देऊन वरून ही रक्कम १५ दिवसांनी मिळेल, असे सांगितले होते. एकप्रकारे ही शेतकऱ्यांची चेष्टाच असल्याचा आरोप तरूण शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवर केला होता. समाजमाध्यमावरील या चर्चेची प्रशासनाला दखल घ्यावी लागली.
The market committee took action against the onion trader
If you have any doubt, then contact me