". तीन बायकांनी नवऱ्याला कोर्टातच फटकवले : हे आहे कारण

तीन बायकांनी नवऱ्याला कोर्टातच फटकवले : हे आहे कारण

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

तीन बायकांनी नवऱ्याला तेही भर कोर्टात फटकावल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या शाहगंज तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या तीन्ही बायकांना सोडून तो चौथ्या बायको बरोबर राहात होता त्यामुळे संतापलेल्या बायकांनी या महाशयांवर चांगलाच हात साफ केला.

फजलुर्रहमान असं या मार खाणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तो वाराणासीच्या आदमपूर येथील पठानीटोला येथे राहतो. त्याने आतापर्यंत चार लग्न केले आहेत. त्याची पहिली बायको शाहगंज नगरच्या एराकियाना परिसरातील, दुसरी पत्नी कानपूरच्या जाजमऊ येथील तर तिसरी पत्नी आजमगडची आहे. मुलं झाल्यानंतर फजलुर्रहमानने त्यांना सोडून दिले. 

फजलुर्रहमानला पहिल्या पत्नीकडून एक 13 वर्षाचा मुलगा आहे. तो फजलुर्रहमान सोबत राहतो. त्यासाठी त्याने एकतर्फी आदेश मिळवला होता. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल केल्यावर कोर्टाने पहिल्या पत्नीला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली. पण नवरा आपल्याला मुलाला भेटू देत नव्हता म्हणून या महिलांनी हे पाऊल उचलले.

 न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार होती. या सुनावणीला हजर राहण्यासाठी फजलुर्रहमान आला होता. तो येताच त्याच्या तिन्ही बायकांना त्याची येथेच्छ धुलाई केली. त्यानंतर लोकांनी फजलुर्रहमानला पोलिसांच्या हवाली केलं. शाहगंज पोलिसांनी हा आपआपसातील वाद असल्याचं सांगितलं.

Three wives beat the husband In Court 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)