". 825 किलो कांदा विकून व्यापाऱ्यालाच द्यावा लागला एक रुपया

825 किलो कांदा विकून व्यापाऱ्यालाच द्यावा लागला एक रुपया

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

825 किलो कांदा (Onion) विकून एक रुपयाही शेतकऱ्याच्या हातात पडला नाही, उलट हिशोब केल्यावर एक रुपया व्यापाऱ्याला देण्याची वेळ या दुर्दैवी शेतकऱ्यावर आली . उस्मानाबाद (usmanabad) जिल्ह्यातील दाऊतपूरच्या (dautpur) बंडू भांगे (bandu bhange) यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. सोलापूर (solapur) कांदा मोंढ्यावर त्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणला होता.

बंडू भांगे यांनी ८२५ किलो कांदा ५० पिशव्या भरून सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. त्यांचा कांदा हलक्या दर्जाचा असल्यामुळे प्रतिक्विंटल शंभर रुपये दराने विकला गेला. ८२५ किलो कांद्यासाठी ८२५ रुपये शेतकरी बंडू भांगे यांना मिळणार होते. परंतु, हमाली – ६५.१८ रुपये, स्त्री हमाली – २५.५० रुपये, तोलाई – ३८.७८ रुपये आणि वाहतूक खर्च – ६९७ रुपये असा एकूण ८३६.४६ रुपये खर्च झाला. म्हणजेच एकूण कांद्याच्या विक्रीमूल्यापेक्षा १.४६ रुपये जादा खर्च झाला.

कांद्याचे भाव सातत्याने कोसळत असून शेतकऱ्यांना त्यांचा खर्चही निघत नसल्याने कांद्याचे दर वाढवावेत अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा शेतकरी संघटनेने सरकारला दिला आहे.

After selling the onion, one rupee had to be paid to the trader

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)