माझा महाराष्ट्र : चिन्ह गेल्याने काही फरक पडत नाही , लोक नवं चिन्ह मान्य करतील , अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात काहीही महत्वाची घटना घडली तरी शरद पवार यांच्या भूमिकेकडे किंवा ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे शिवसेना पक्ष Shivsena आणि धनुष्यबाण चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने Election Commission दिलेल्या निर्णयाबाबत ते काय बोलतात याबाबत सर्वांना उत्सुकता होती.
पवार यांनी म्हटलंय, “हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. त्याने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये Congress एकदा इंदिरा गांधी Indira Gandhi आणि इतर हा वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती. पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतलं. ते चिन्ह लोकांनी मान्य केलं. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसंच शिवसेनेच्या बाबतीत लोकं नवं चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल”.

.jpeg)
If you have any doubt, then contact me