माझा महाराष्ट्र : निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणे हे निवडणूक आयोगाचे काम नाही. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे Uddhav Thakray यांनी सर्वोच्च न्यायालयात Supreme Court जावे, तेथे त्यांना नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या विरोधात निर्णय देऊन धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना Shivsena पक्षाचं नाव शिंदे गटाला बहाल केलं आहे. या निर्णयानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक आयोगाच्या Election Commission या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे.
आंबेडकर यांनी पुढे म्हटलंय, की निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या वादावर आपला निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्यच आहे. त्यांनी कोर्टात अपील केलं पाहिजे. चिन्ह किंवा पक्षाच्या झगड्यात निर्णय देणं निवडणूक आयोगाच्या अधिकारात येतं का? हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
If you have any doubt, then contact me