माझा महाराष्ट्र :
पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट (President's rule) उठवली गेली नसती, असे झाल्यानेच उद्धव ठाकरे (Uddhav Thakray) मुख्यमंत्री झाले, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत त्यांना माहिती असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले.
पहाटेच्या शपथविधी बाबत शरद पवार यांना माहिती होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी पवार यांनी याबाबत आपले मौन तोडले. पुण्यात विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. चिंचवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, की मी पोटनिवडणूकीच्या प्रचाराला जात नाही, पण पक्षाच्या पडत्या काळात ज्यांनी पक्षाला साथ दिली, त्यांच्याशी दोन शब्द बोलता येईल म्हणून मी इथे आलो. पहाटेच्या शपथविधीबाबत विचारले असता ते म्हणाले की सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राज्यात जी राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडले ते तुम्हा सर्वांनाच माहित आहे. राज्यात तेव्हा तसे काही घडले नसते, तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असे शरद पवार यावेळी म्हणाले.
NCP chief Sharad Pawar on early morning swearing in


If you have any doubt, then contact me