माझा महाराष्ट्र :
हेडलाईन ऐकून चेहर्यावर स्माईल आलं ना? तर हेरा फेरी 3 (Heraferi 3) बद्दल नवीन अपडेट समोर आले आहेत. या चित्रपटाचे शुटींग सुरु झाल्याची बातमी आली आहे. त्यामुळे ' ये बाबुराव का स्टाईल है' हा डायलाँग पुन्हा ऐकायला मिळणार आहे. सुनील शेट्टी (Suniel Shetty), परेश रावल (Paresh Rawal) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) या तिघांचा सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे.
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. 'हेरा फेरी' नंतर 'फिर हेरा फेरी' (Phir Hera Pheri) हा दुसरा भाग 2006 मध्ये रिलीज झाला. या सिक्वेलला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
‘हेरा फेरी’ चित्रपटाचा तिसरा भाग येणार याची काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘हेरा फेरी’च्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते. आता अखेर आज या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
मध्यंतरी या चित्रपटाबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाला अक्षय कुमारने नकार दिल्यामुळे त्याची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याचं समोर आलं होतं. पण आता निर्माते आणि अक्षय कुमार यांच्यामधील वाद मिटला असून या चित्रपटात अक्षय कुमारच दिसणार आहे. आता या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यामुळे राजूची भूमिका अक्षय साकारणार हे अखेर स्पष्ट झालं आहे.
पुतण्याच्या लग्नात काकाने पाडला पैशांचा पाऊस
या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये (Empire Studio) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली. या चित्रपटात कुठली अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. हेरा फेरी ३ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा फरहाद सामजी (Farhad Samjhi) याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
Filming of Hera Pheri 3 has started

If you have any doubt, then contact me