करीम यादव असे या काकाचे नाव असून ते गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यातील केकरी तालुक्यातील अनगोळ गावचे माजी सरपंच आहेत. पुतण्याच्या लग्नाच्या वेळी त्यांनी घराच्या छतावर उभे राहून 100 आणि 500 रुपयांच्या नोटांची बरसात केली. करीम यादव जेव्हा नोटांचा वर्षाव करत होते, तेव्हा त्यांच्या पुतण्याची मिरवणूक गावातून जात होती. यावेळी करीम यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण गावाला नोटा वाटले. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात जोधा-अकबर चित्रपटातील अझिमो-शान शहेनशाह हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे.
माजी सरपंच करीम यादव यांचा भाऊ रसूल यांचा मुलगा रज्जाकचे लग्न अत्यंत धूमधडाक्यात झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावभर मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय नोटांचा पाऊसही पडला. सायंकाळी गावातून मिरवणूक निघाली. यावेळी करीम यादव आणि त्यांचे नातेवाईक घराच्या छतावर पोहोचले आणि त्यांनी तेथे नोटांचा वर्षाव करायला सुरुवात केली. त्यांनी 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटांचा वर्षाव केला. त्यांचे संपूर्ण कुटुंब नोटा उडवत होते, ते गोळा करण्यासाठी मोठा जमाव जमला होता. लग्नाच्या सोहळ्यात कुटुंबीयांनी लाखो रुपयांचा चुराडा केला. हे लग्न 16 फेब्रुवारीला झाले. केवळ गावातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात या लग्नाची चर्चा आहे.
Uncle rained money on his nephew's wedding


If you have any doubt, then contact me