माझा महाराष्ट्र : शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) काढून घेतल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thakray) अडचणी कमी व्हायला तयार नाहीत. आता तर नवीन घेतलेले मशाल चिन्हही जाते की काय, अशी परिस्थिती तयार झाली आहे. या मशाल चिन्हावर बिहारमधील (Bihar) समता पार्टीने (Samta Party) दावा केला असून याबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाणार असल्याचे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल (Uday Mandal) यांनी सांगितले.
शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल नुकताच लागला. यात ठाकरे गटाला मोठा धक्का बस्लाा. शिवसेना पक्ष व धनुष्यबान चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळाले.
सुरुवातीला धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर ठाकरे गटाने मशाल चिन्ह घेतले होते. आता या मशालवरही समता पार्टीने दावा दाखल केला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
समता पार्टी ही बिहारमधील एक पार्टी आहे. या पार्टीची ओळख मशाल आहे. आम्हाला शिवसेनेच्या अंतर्गत वादात पडायचे नाही; परंतु आम्हाला आमचे मशाल हे चिन्ह हवंय, अशी मागणी मंडल यांनी केली आहे. त्यामुळे मशाल हे चिन्हही ठाकरे यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Uddhav Thakray's Mashal is in danger


If you have any doubt, then contact me