". चोरट्यांनी मारला 3.88 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला : पोलिसांची १५ पथके चोरांच्या मागावर

चोरट्यांनी मारला 3.88 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला : पोलिसांची १५ पथके चोरांच्या मागावर

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र : गुजरात (Gujrat) राज्यातील सुरेंद्रनगर (Surendranagar) जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. कुरीअर कंपनीच्या डिलीव्हरी व्हॅनमधून घेऊन जात असलेले 3 कोटी 88 लाखांचे दागिने (Ornaments) चोरट्यांनी लुटून नेले. राजकोट - अहमदाबाद (Rajkot- Ahmadabad Highway) महामार्गावर शुक्रवारी (17) रात्री उशिरा ही चोरी झाली. पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभिर्याने घेतले असून चोरांना पकडण्यासाठी 15 पथके तयार केली आहेत. चोर तीन कारमध्ये आले होते.

याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख हरेश दुधत (Haresh Dudhat) यांनी सांगितले की चोर दागिने घेऊन फरार झाले. कुरिअर कंपनीच्या अधिकार्‍याने सांगितले की हे दागिने अहमदाबाद विमानतळावर (Ahmadabad Airport) नेले जात होते. तेथून ते देशभरातील विविध ठिकाणी पाठविण्यात येणार होते. सुमारे 50 व्यापाऱ्यांचे हे दागिने होते. या व्हॅनमधून रोज महागड्या वस्तू नेल्या जात होत्या.

Thieves stole jewelry

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)