राज्य कर्मचारी महासंघाने परिपत्रक काढत पगारवाढीसंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता; मात्र राज्य सरकारने यासंदर्भात आदेश काढला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या धरतीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या सेवेतील १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. वेतन श्रेणीतील तफावतीनंतर एक समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार शिफारशी वित्त आयोगाने स्विकारल्या आहेत. त्यामुळे १०४ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यानंतर राज्यात देखील हा आयोग दाखल करण्यात आला होता.

If you have any doubt, then contact me