". भरधाव वाहनाने १७ महिलांना उडवले : : तीन महिला ठार, तर १४ जखमी :: पुणे - नाशिक महामार्गावरील दुर्दैवी घटना

भरधाव वाहनाने १७ महिलांना उडवले : : तीन महिला ठार, तर १४ जखमी :: पुणे - नाशिक महामार्गावरील दुर्दैवी घटना

माझा महाराष्ट्र
0
माझा महाराष्ट्र : पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात सोमवारी (दि. 14) रात्री भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना जोरदार धडक दिली. यात तीन महिलांचा मृत्यू झाला , तर १४ महिला जखमी झाल्या आहेत. (Pune Nashik Highway)

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून पोलिस (Police) त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त महिला अपघातस्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. त्यानंतर रस्ता ओलांडत असताना या महिलांना पुण्याकडून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर 14 महिला गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात
आलं. 

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)