माझा महाराष्ट्र :
धाराशिव उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये दोन नोव्हेंबर 2015 रोजी आंदोलन झालं होतं या आंदोलनामध्ये प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये वाद झाला होता. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा निकाल नुकताच न्यायालयाने दिला.
काय घडले होते
जिल्हा परिषदेचा अपंग निधी खर्च न केल्याने प्रहार संघटनेने आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले होते. या प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह मयूर काकडे, बलराज रणदिवे, बाळासाहेब कसबे, चंद्रकांत जाधव या पाच जनांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय दिली भिक्षा
या प्रकरणात धाराशीव जिल्हा व सत्र न्यायालयाने बच्चु कडू यांना दोषी धरत कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावली आहे. यात अडीच हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. तसेच पुढील काळात चांगले वर्तन केले जाईल, असे शपथपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी हा निकाल दिला.
MLA Bachu Kadu was sentenced by the court

If you have any doubt, then contact me