". नातेवाईकांना 'रिटर्न गिफ्ट' म्हणून दिल्या चोरीच्या दुचाकी : नंतर घडले असे

नातेवाईकांना 'रिटर्न गिफ्ट' म्हणून दिल्या चोरीच्या दुचाकी : नंतर घडले असे

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

नातेवाईकांना त्यांच्या मोटरसायकलच्या बदल्यात चोरीची मोटरसायकल देऊन त्यांची फसवणूक करणारा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याला नाशिक (Nasik) गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. या प्रकारामुळे मात्र नातेवाईक चांगलेच अडचणीत आले आहेत. या 'रिटर्न गिफ्टची' चांगलीच चर्चा रंगली आहे.

नाशिकच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरी प्रकरणातील संशयित आरोपी दत्ता नरहरी घोरपडे (Datta Narhari Ghorpade) याला पकडले आहे. त्याच्याकडून पोलीसांनी दीड लाखांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

संशयित घोरपडे हा गॅरेजमध्ये काम करायचा. मात्र, वापरासाठी तो नातेवाइकांच्या दुचाकी स्वत:कडे घ्यायचा. वापर करतानाच या दुचाकींची परस्पर विक्री करुन पैसे कमवायचा. नातेवाइकांनी दुचाकी मागितल्यास, भलतीच दुचाकी आणून त्यांना द्यायचा. नातेवाइकही कोणती तरी दुचाकी मिळाली म्हणून गप्प बसायचे. मात्र, नातेवाइकांच्या दुचाकींची विक्री करून त्यांना चोरीच्या दुचाकी देण्याचा अजब फंडा या चोरट्याने वापरला. मात्र आता या नातेवाईकांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

घोरपडे हा यापूर्वी गॅरेज मध्ये काम करत असल्याने नातेवाइकांनी विश्वास ठेवला. आणली असेल कुणाची गाडी म्हणून दुर्लक्ष केले. पण त्यांना आता मिळालेले रिटर्न गिफ्ट चर्चेचा विषय ठरत असून कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ठक्कर बाजार बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी चोरीच्या उद्देशाने संशयित आल्याचे गुन्हे शाखा एक पथकातील अंमलदार प्रशांत मरकड यांना समजले. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, संदीप भांड, शरद सोनवणे, विशाल देवरे, महेश साळुंके, मुक्तार शेख आणि अण्णासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने ठक्कर बाजारात सापळा रचला. चोरीच्या प्रयत्नात असताना संशयित घोरपडे याला ताब्यात घेण्यात आले. 

यामध्ये तीन गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीसांच्या ताब्यात संशयित दत्ता घोरपडे याला दिले आहे. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Cheating relatives by giving them a stolen motorcycle in exchange for their motorcycle

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)