". रील स्टार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

रील स्टार गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

माझा महाराष्ट्र
0

 

माझा महाराष्ट्र : उज्जैनचा कुप्रसिद्ध डॉन दुर्लभ कश्यप (Durlabh Kashyap) याच्या दशहत निर्माण करण्याच्या धर्तीवर इंस्टाग्रामवर दहशतीचे रील टाकणाऱ्या, शिरूर (Shirur) आणि शिक्रापूर (Shikarpur) परिसरात दशहत निर्माण करणाऱ्या तीन गुंडांची धिंड पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिसांनी धिंड काढली. विकी ऊर्फ दाद्या राजेश खराडे (वय 19), आदित्य नितीन भोई (वय 20), नल्लूआदिन जैनुद्दीन शेख (वय 19, सर्व रा. शिरूर) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी 21 फेब्रुवारी रोजी टाकळी भीमा (Takli Bhima)  (ता. शिरूर) या परिसरात दरोडा टाकण्यासाठी गावठी पिस्तुलासह हत्यारे घेऊन होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन त्यांचे दोन साथीदार पळून गेले होते. यातील आरोपी खराडे हा सोशल मीडियात रील टाकत आहे. हत्यारांसह दहशतीचे रिल्स तो बनवतो. दुर्लभ कश्यप या गुन्हेगाराचा तो चाहता आहे. तो बाल गुन्हेगार असताना त्याने खून, जबरी चोरी यासह अनेक गंभीर गुन्हे केले आहेत.

शिक्रापूर पोलिसांनी या आरोपींची पुणे-नगर मुख्य रस्ता, विविध चौक, कॉलनी, शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये धिंड काढली. या आरोपींना बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या आरोपींवर शिक्रापूर पोलीस हद्दीमध्ये सहा गुन्हे दाखल आहेत.

Police busted the hooligans

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)