माझा महाराष्ट्र :
माझ्या नादाला लागू नका, अन्यथा पुण्याला येऊन बारा वाजवीन, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Minister Narayan Rane) विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांना दिला आहे. अजित पवार यांनी नुकतेच नारायण राणेंवर, 'यांना बाईनं पाडलं' म्हणत जोरदार टीका केली होती. त्याला राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणे सध्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, बारामतीच्या (Baramati) बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करा. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, मला माहिती नाही. मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणात (Konkan) पाठवले होते. तेथून मी सहा वेळा निवडून आलेलो आहे. महिला असेल, पुरूष असेल, उमेदवार हा उमेदवार असतो, आणि मी माझ्या मतदारसंघात नाही पडलो, तर बाहेरच्या मतदारसंघातून पडलो, असे राणे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakray) यांच्याबद्दल बोलताना राणे म्हणाले, आता त्यांच्याकडे काय राहिलं आहे? कुठलंच अस्तित्व त्यांचं शिल्लक नाही. अडीच वर्षांत आपण काय केलं, हे आधी पाहा, असा सल्ला राणे यांनी ठाकरेंना दिला.
नारायण राणेंच्या टिकेवरून अजित पवार यांनी केलेली टीका त्यांना फारच टोचल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही अजितदादांचं कौतूक केलं होतं.
Narayan Rane on Ajit Dada Pawar at Kolhapur


If you have any doubt, then contact me