". चॅट जीपीटी'ला साधं समजू नका : वसूल करून दिले 90 लाख

चॅट जीपीटी'ला साधं समजू नका : वसूल करून दिले 90 लाख

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :

ओपन एआयचा एआय चॅटबॉट म्हणजेच चॅट जीपीटी (chatgpt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अत्यंत क्लीष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यात हा रोबोट पटाईत आहे. आता केवळ शंकांचे समाधान शोधण्यासाठी या रोबोटचा उपयोग होत नाही. या रोबोटने दिलेल्या सल्ल्यामुळे सुमारे 90 लाख रुपये वसूल झाल्याचा प्रकार घडला आहे.

त्याचे झाले असे, की ट्वीटरवर, ग्रेग इसेनबर्ग नावाच्या व्यक्तीने चॅट GPT द्वारे त्याचे अडकवलेले १,०९,५०० डॉलर कसे परत मिळाले, याची माहिती देणारी पोस्ट टाकली आहे. ग्रेग इसेनबर्गच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते Late Checkout चे सीईओ आहेत जे एक डिझाइन एजन्सी आहे. याआधी त्यांनी रेडिट इंक आणि टिक टॉकमध्ये सल्लागार म्हणून काम केले आहे.

इसेनबर्ग यांनी सांगितले की, बहुतेक लोक जेव्हा त्यांचे पैसे कुठेतरी अडकतात तेव्हा वकीलाची मदत घेतात, परंतु त्यांनी चॅट जीपीटीची मदत घेतली आणि त्यांचे काम झाले. २०२२ मध्ये त्यांच्या ग्रुपने एका लोकप्रिय ब्रँडला काही डिझाइन्स दिल्या होत्या. ब्रँडला डिझाईन आवडले आणि नवनवीन डिझाईन्स मागवत राहिले. ब्रँडने पैसे देण्याचे आश्वासन दिले होते पण तसे झाले नाही.

वकिलाकडे जाण्याऐवजी, ग्रेग इसेनबर्गने चॅट जीपीटीची मदत घेतली आणि चॅट जीपीटीला पैसे वेळेवर परत करण्यासाठी क्लायंटला ईमेल लिहायला सांगितले. इसेनबर्ग म्हणाले की, त्यांनी वकील नियुक्त केला असता तर त्यांना १,००० डॉलर खर्च आला असता, तर चॅट जीपीटीने हे काम विनामूल्य केले. ग्रेग इसेनबर्ग यांनी सांगितले की, क्लायंटला ई-मेल पाठवल्यानंतर त्यांनी काही वेळातच अडकलेले पैसे दिले .

ChatGPT AI: चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे Google देखील म्हणत आहे. तरुण आणि तांत्रिक क्षेत्रातील जाणकार आजकाल सोशल साईट्सवर यावर सतत चर्चा करताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे त्यात २०२१ पूर्वी फक्त डेटा फीड आहे.

डिजिटल तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा नवा टप्पा चॅटबॉट प्रणालीच्या स्वरूपातील आहे. लिखित अथवा वाचिक मानवी संवादाचं हुबेहूब अनुकरण हे चॅटबॉटचं प्राथमिक कार्य. चॅट-जीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर- जीपीटी) हा सर्वात ताजा आणि नावीन्यपूर्ण बॉट आता या क्षेत्रात खळबळजनक क्रांती करू पाहत आहे. सॅन फ्रान्सिस्कोस्थित ओपन एआय या कंपनीने तो उपलब्ध करून दिला आहे. नोव्हेंबर २०२२मध्ये प्रसृत केलं गेलेलं हे तंत्रज्ञान अवघं सायबरविश्व व्यापण्याच्या दिशेनं झपाटय़ानं पावलं टाकत आहे.

चॅट-जीपीटी प्रणालीवरील माहिती संचय आणि माहिती प्रसारण दोन्ही मानवी सहभागातूनच साकारत आहे. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला किंवा मानवी सहयोगाला चॅट-जीपीटी भविष्यात पर्याय ठरेल काय, या प्रश्नाचे उत्तर तूर्त तरी नाही, असेच द्यावे लागेल. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)