". अहमदनगरचेही नामांतर होणार? : काय म्हणाला हा नेता

अहमदनगरचेही नामांतर होणार? : काय म्हणाला हा नेता

माझा महाराष्ट्र
0

 


माझा महाराष्ट्र :
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं धाराशीव (Dharashiv) नामकरण झाल्यानंतर आता अहमदनगरचेही (Ahmednagar) नामांतर होण्याची शक्यता आहे . शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर 'अहिल्यानगर' होणार असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलं आहे.
केंद्र सरकारने (Central Government) औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराला नुकतीच मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) राज्य सरकारला नामांतर करण्यास कोणतीही हरकत नसल्याचं पत्र पाठवलं होतं. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतर आता औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहदनगरचं (Ahmednagar) नामांतरण होणार असल्याचं बोललं जात आहे. 
गोपीचंद पळडकर यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?
"औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर 'अहिल्यानगर' देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच," असं ट्वीट करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेंनाही टॅग केलं आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय झाला होता. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळण्याचे संकेत असतानाच ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली होती. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमध्ये नामांतराचाही मुद्दा होता. मात्र राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र टीका झाल्यानंतर शिंदे सरकारने हा निर्णय कायम ठेवत दोन्ही शहरांची नावं बदलण्याचं ठरवलं होतं. 
अहमदनगरचंही नामांतर व्हावं या मागणी बरोबरच अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावं, अशी ही नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात जिल्हा कृती समितीने अनेक आंदोलने केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच म्हणून समजा, असे आश्वासन जिल्हा कृती समितीला दिले , मात्र अजून त्यावर निर्णय झालेला . 2024 च्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
After Chhatrapati Sambhaji Nagar and Dharashiv, Ahmednagar will also be renamed

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)