माझा महाराष्ट्र :
खली हे नाव कुणाला माहिती नाही, असा कुणी विरळाच. आता नवीन खली तयार होतोय, आणि त्याने खाण्याच्या बाबतीत खलीचाही विक्रम तोडायचे ठरवलंय. हा नवीन खली आहे उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा भागातील. येथील एका इचौली नायकपूरवा गावातील हा एका मजुराचा मुलगा असून त्याचे नाव आहे, सीरज (Siraj). उंचीच्या बाबतीत त्याने खलीलाही मागे टाकलेय.
द ग्रेट खली, (the great Khali) हा पहिलवान भारतातच नव्हे, तर परदेशातही माहिती असलेला आहे. त्याने वर्ल्ड व्रेस्टलिंग एंटरटेनमेंट (wwe) या संस्थेद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्त्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन भारताचे नाव संपूर्ण जगात गाजवले आहे. त्याला टक्कर देणारा नवा पहिलवान उत्तर प्रदेशमध्ये तयार होतो.
सिरज त्याच्या उंचीमुळे तो कायम चर्चेत असतो. असे असले तरी त्याच्या मोठ्या आहारामुळे त्याला कायम अर्धपोटी राहावे लागते. त्याचे वडील पाल मजुरी करतात. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यांना थोडीफार जमीन आहे, पण त्यात काही भागत नाही. सिरज सध्या पदवीचे शिक्षण घेत असून पदवीनंतर त्याला सैन्यात भरती व्हायचे आहे. तो सध्या 18 वर्षांचा असून त्याचे वजन 115 किलो आहे.
सिरजला अनवाणी फिरावं लागतं, कारण त्याच्या मापाच्या चपला बाजारात मिळत नाही. त्याला रेडीमेड कपडेही घालायला मिळत नाही, ते शिवून घ्यावे लागतात. त्याला झोपण्यासाठी घरच्यांना त्याच्या मापाचा बेडही तयार करून घ्यावा लागला. त्यासाठी दोन गाद्या जोडून घ्याव्या लागल्या आहेत.
परिसरातले लोक त्याला खली म्हणून हाका मारतात. रिज एका वेळी 90 किलो वजन सहज उचलू शकतो. जास्त उंची असल्याने त्याला घरात वाकून जावे लागते. रिसजसमोर त्याचे कुटुंबिय फारच बुटके वाटतात. सिरज रोज 10 किलोमीटर पळतो, त्यामुळे त्याची उंची इतकी वाढलीय अशी त्याची आई सांगते.
असा आहे सिरजचा आहार
तब्बल सात फूट दोन इंच उंची असलेला हा सिरज रोज 18 चपात्या, अर्धा किलो गुळ, भात , भाज्या व अनेक पदार्थ खातो.
थोडं खऱ्या खलीबद्दल
खली ऊर्फ दिलीप सिंह राणा हा कुस्तीपटू आहे. त्याचा जन्म 27 आॅगस्ट 1972 साली झाला. डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये 2007 साली तो हेवी वेट चॅम्पीयन झाला होता. त्याचे पूर्ण नाव आहे, दिलीप सिंह ज्वाला सिंह राणा. टोपन नाव आहे, जायंत सिंग व द ग्रेट खली. सध्या तो अमेरिकेतील टेक्सास राज्यात राहायला आहे.
त्याचा जन्म हिमाचल प्रदेशमधील धिराईना येथे झाला. त्याचे वजन 157 किलो आहे. उंची 7 फूट 1 इंच आहे. खली याचा जन्मही एका गरीब कुटुंबात झाला. त्याला सहा भाऊ आहेत. लहानपणापासून त्याला मजुरीचे काम करावे लागले. सुरुवातीला त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करावी लागली, येथे एका पोलीस अधिकºयाने त्याला पाहिल्यानंतर त्या पोलिसांत नोकरी मिळाली. तांदी देवी असे त्याच्या आईचे नाव आहे.
सन 2002 साली त्याचा विवाह हरमिंदर यांच्याशी झाला. त्याला एक मुलगी आहे. खलीला अनेक चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली. अनेक मालिकांमध्ये तो पाहुणा कलाकार म्हणून येत असतो.
If you have any doubt, then contact me