माझा महाराष्ट्र :
मोबाईल हा आजकाल आपल्या जीवनाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. मोबाईलशिवाय जगणे आता अशक्य वाटू लागले आहे. थोडा वेळही मोबाईलला सोडून राहणे आता लोकांना मान्य नाही. मात्र आता मोठ्यांचे पाहून लहानगेही मोबाईलवर तासन्तास राहायला लागले आहेत. त्यामुळे मोबाईलचे व्यसन सोडवणारे एक्स्पर्टही तयार झाले आहेत. हे व्यसन इतक्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचले आहे, की मोबाईलमुळे अक्षरश: वेड लागण्याची वेळ आली आहे.
हा किस्सा पोर्तुगाल या देशातील आहे. जिथे एक मुलगी दिवसाचे 14 तास मोबाईल पाहायची. त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या व्यसनापाई ती आता अपंग झाली आहे.
फेनेला फॉक्स असे या मुलीचे नाव आहे. ती या मोबाईलच्या व्यसनामुळे वेडी झाली आहे. हा आजार इतका गंभीर झालाय की या आजारावर उपचार करणेही अवघड झाले आहे. ती दिवसाला 14 तास मोबाईलवर राहायची. सुरुवातीला डोके व मान दुखण्याची तक्रार सुरू केली. तिने डॉक्टरांनाही दाखवले; पण डॉक्टरांना आजाराचा अंदाज आला नाही. फेनेलाची तब्येत आणखीनच बिघडल्यावर ती तिच्या आई-वडिलांकडे इंग्लंडला गेली. विमानतळावर आल्यावर ती अचानक बेशुद्ध झाली. तेथील डॉक्टरांनाही या आजाराचा अंदाज आला नाही, मग एके दिवशी तिच्या वडिलांना सायबर आजाराबद्दल समजले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांची मुलगी डिजिटल व्हर्टिगोची बळी ठरली आहे.
2021 च्या सुरुवातीला तिला डोके आणि मानेत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यानंतर चक्कर येऊ लागली. त्यानंतर तिला उलट्याही होऊ लागल्या. तिचा बॅलन्सही जाऊ लागला, परिणामी तिला नीट चालता येणेही अवघड झाले. तिचे उत्पन्नही सोशल मीडियावरच अवलंबून आहे. आता ती मोबाईल पाहू शकत नाही. त्यामुळे तिचे उत्पन्नही कमी होणार आहे.
नव्या संशोधनानुसार ड्रगच्या व्यसनाप्रमाणेच मोबाईलचे व्यसन असू शकते. सध्या मुलांना हाता मोबाईल असल्याशिवाय ते जेवायलाच बसत नाही. कार्टून, गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची सवय अतिघातक आहे. याला काही प्रमाणात पालकही जबाबदार आहेत. मुलं जेवत नाही, हे पाहून पालक त्यांच्या हातात जेवण देतात. सुरुवातीला हे चांगलं वाटतं; परंतु मग त्याची सवय होते. पुढे जाऊन ही सवय वाढत जाते. या सवयीमुळे लहान वयातच असेक आजार मुलांना जडतात. पुढे जाऊन ते गंभीर रुप धारण करतात. यात शारीरिक व मानसिक आजारांचा समावेश आहे.
काही शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे, की मोबाईलच्या अतिवापरामुळे स्मरणशक्ती कमी होते. शिकण्याची शक्ती मंदावते. मुलांकडून मोबाईल घेतल्यास त्यांची चिडचिड होते. यातून मग काहीही घडू शकते. त्यामुळे मोबाईल वापरावर निर्बंध घालणे गरजेचे आहे.
If you have any doubt, then contact me