माझा महाराष्ट्र
अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन म्हणुन ओळखले जाणारे भंडारदरा धरण आज संध्याकाळी १० हजार ५२० दशलक्ष घनफूट झाले असुन भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे.
हे वाचा👉विमानाने फिरणारा हाय प्रोफाईल चोर पाहिलाय?
गतवर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने पाठ फिरवली होती . तसेच जायकवाडी धरणाच्या परिसरातही आभाळमाया कमी झाली असल्याने भंडारदरा धरणातुन जायकवाडीसाठी पाणी झेपावले गेले होते. त्यामुळे भंडारदरा धरण तळाशी जाऊन टेकले होते. जून महिना संपला तरी भंडारदर्याला पाऊस दाखल होण्याचे नाव घेत नव्हता.
हे वाचा👉कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?
जुलै महिन्याच्या एक तारखेपासुनच भंडारद-याला मान्सूनचे जोरदार आगमन झाले . कधी पावसाचे तांडव सुरू राहिले तर कधी ढगफुटी सदृश्य पावसाने आपला हिसका दाखवला . अखेर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा दोन ऑगस्ट रोजी १० हजार ५०० दशलक्ष घनफूट झाला आणि भंडारदरा धरण तांत्रिक दृष्ट्या भरले . भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याची घोषणा जलसंपदा विभागाकडून केली गेलेली नसली तरी धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट होताच तांत्रिक दृष्ट्या भरत असते .
हे वाचा👉विम्यावरील जीएसटी रद्द करा : केंद्रीय मंत्री गडकरी यांची मागणी
गुरुवारी मध्यरात्रीपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे . त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे . धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातुन बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून टप्प्याटप्प्याने पाण्यात वाढ करत विसर्ग वाढविण्यात येत आहे.
हे वाचा👉आम्हीही याच देशात राहतो : कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक
शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून ३हजार ८८१ क्युसेस व विज निर्माण केंद्रातुन ८३० क्युसेस असा एकुण ४ हजार ७११ क्युसेस विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे . त्यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत असुन संध्याकाळी सहा वाजता निळवंडे धरणाचा पाणीसाठा ५ हजार ३० दशलक्ष घन फुट झाला असुन निळवंडे धरण ६०.४० टक्के भरले आहे.
हे वाचा👉पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीलाही लावले कामाला
शुक्रवारी भंडारदर्याला जोरदार पाऊस कोसळला . गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ५२ मी मी पाऊस कोसळला असुन घाटघर येथे ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.रतनवाडी ९३ मिलिमीटर तर पांजरे येथे ८५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला .
If you have any doubt, then contact me