". पाहा भंडारदरा धरण किती भरले

पाहा भंडारदरा धरण किती भरले

माझा महाराष्ट्र
0

 

माझा महाराष्ट्र

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरूच असून धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने धरण 94% च्या वर भरले आहे. ही आकडेवारी १ ऑगस्ट च्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची आहे. धरणातून 1928 क्यूसेक्सने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी भंडारदर्‍याला पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.


पूजा खेडकर प्रकरणाने यूपीएससीलाही लावले कामाला


भंडारदरा धरणाच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून धरणाच्या सांडव्यातून १०९८ क्युसेक व विजनिर्माण केंद्रातुन ८३० असा एकुण १९२८ क्युसेक विसर्ग प्रवरा नदी सोडण्यात आला आहे. धरणाचा पाणीसाठा १०३१३ दशलक्ष घनफूट झाला असून भंडारदरा धरण ९३.४२ टक्के भरले आहे . 


कुणाला मिळणार मोफत गॅस सिलिंडर?


गेल्या २४ तासांमध्ये भंडारदर्‍यामध्ये ६० मिलिमीटर पाऊस झाला असून घाटघरला ९५  मिलिमीटर, रतनवाडी येथे  ८८ मिलिमीटर, पांजरे येथे  ८३ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. ११०३९ दशलक्ष घनफूट पाण्याची क्षमता असणारे भंडारदरा धरण 94 टक्के भरले आहे.


आम्हीही याच देशात राहतो : कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)