राज्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण 500 ठिकाणी आपला दवाखाना सुरु केले जाणार आहे.
मुंबईत सुरु केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरु झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखान्याचे प्रातिनिधिक स्वरुपात उदघाटन करण्यात आले.
If you have any doubt, then contact me