". पंजाबराव डख हवामान अंदाज : लवकरच सुरू होणार पावसाला सुरुवात

पंजाबराव डख हवामान अंदाज : लवकरच सुरू होणार पावसाला सुरुवात

माझा महाराष्ट्र
0



माझा महाराष्ट्र ( पंजाबराव डख हवामान अंदाज : लवकरच सुरू होणार पावसाला सुरुवात )

महाराष्ट्रातील जनतेसाठी हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. महाराष्ट्रात लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. 

दारुच्या नशेत फुशारकी मारली आणि दिली खुनाची कबुली

डख यांनी आपल्या अंदाजामध्ये म्हटले आहे, की अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय वादळ आले आहे. त्यामुळे मान्सूनचे वारे या वादळाकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात मान्सून लांबणीवर जाणार आहे. या वादळाचा प्रभाव २० जूनपर्यंत दिसून येणार आहे. ायानंतर चक्रीवादळाचा प्रभाव संपणार असून त्यानंतर थोड्या दिवसांनी महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल. राज्यात मान्सून आला होता; परंतु अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून वादळाकडे खेचला गेला. हे चक्रीवादळ गुजरातकडे सरकल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. पण सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, की मान्सून महाराष्ट्रात पुन्हा सक्रीय होत आहे. राज्यात १८ जूनपर्यंत जोराचे मान्सूनचे वारे राहणार असून यावेळी हवेत बाष्प नसल्यामुळे पाऊस पडणार नाही. पण दि. २५ जूननंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा दमदार हजेरी लावेल. १५जून ते १५ जुलैपर्यंत मान्सून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोहोचलेला असेल. यावेळी महाराष्ट्रामध्ये भाग बदलत प्रायेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल.

'वर्क फ्रॉम होम' बंद केले आणि धडाधड पडले राजीनामे

पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना सूचना केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की आपल्या भागात पुरेसा पाऊस झाल्यानंतर व जमिनीमध्ये एक वितीच्या वर जमीन भिजल्यानंतरच आपण पेरणीचा निर्णय घ्यायचा आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी घाबरून जायचे कारण नाही. या वर्षी राज्यात दुष्काळ पडणार नाही. राज्यामध्ये खूप पाऊस होईल, असे डख यांनी म्हटले आहे.

Punjabrao Dakh Weather Forecast : Rain will start soon

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

If you have any doubt, then contact me

टिप्पणी पोस्ट करा (0)